29.8 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रकैकाडी, पामलोर, टकारी व बंजारा समाजाला अजितदादांनी निधी दिला : किसन जाधव

कैकाडी, पामलोर, टकारी व बंजारा समाजाला अजितदादांनी निधी दिला : किसन जाधव

सोलापूर : जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांचे संयुक्तिक पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याची लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये जिल्हा समन्वयक यशवंत तात्या माने यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.

महायुतीच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा झालेला विकास, राज्याच्या सर्वांगीण विकाससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणकारी घेतलेले निर्णय आणि त्यातून साधलेला विकास, राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मिळालेला लाडकी बहिणींचा उदंड प्रतिसाद यासह विविध योजनेची माहिती अजितदादांनी केलेले कार्य विचार मंजूर केलेल्या योजना याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक निधी दिला . दादांनी मंजूर केलेल्या योजना त्याचा लाभ राज्यातील कोट्यावधी लाभार्थ्यांना झाला. राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी शहर मध्य मतदार संघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास राष्ट्रवादीचे किसन भाऊ जाधव व जुबेर भाई बागवान इच्छुक उमेदवार आहेत या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळो एक संघाने आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उमेश पाटील यांनी कुठे जावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न मात्र आम्ही दादांचे कट्टर समर्थक यापूर्वी होतो आहोत राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील प्रत्येक लाभार्थी म्हणतोय “विकासाचा एकच वादा फक्त अजितदादा”
अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली…अजितदादांनी विविध कामांसाठी शासनामार्फत ७ कोटींचा निधी मंजूर केला असे एकूण ९ कोटींचा निधी समाज मंदिर व विकास कामांसाठी अजितदादांनी उपलब्ध करून दिला दिलेल्या शब्द वेळेत पूर्ण करणारे लोकप्रिय नेते म्हणून अजितदादांची विशेष ओळख आहे.

शहर मध्य मतदार संघातून मला व जुबेर बागवान आमच्या दोघांपैकी कुणालाही संधी मिळाल्यास आम्ही ती निवडणूक जिल्हा समन्वयक यशवंत तात्या माने , जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात एक संघाने लढू व सर्वाधिक मताधिकांनी निवडून येऊ शहर मध्यवर राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकवू अशी प्रतिक्रिया प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माझी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे , महेश निकंबे , सुरेश तोडकरी, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवा प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश झाडबुके ,वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,संतोष गायकवाड माणिक कांबळे हुलगप्पा शासम यांची उपस्थिती होती..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR