27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeसोलापूरकै. वि.मो मेहता प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तक वितरण

कै. वि.मो मेहता प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तक वितरण

सोलापूर-
कै. वि.मो मेहता प्राथमिक शाळा जुळे सोलापूर येथे शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. रांगोळी, फुले, नारळाच्या झावळ्या, फुलांच्या माळा, फुगे, शैक्षणिक साहित्यांची आकर्षक मांडणी, सुंदर फलक लेखन यांनी शाळा व वर्गांची सजावट करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सजावट केलेला सेल्फीपॉईंट ठेवण्यात आला होता. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले.

व्यासपीठावर माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती नितीन पवार यांची प्रमुखउपस्थिती होती. शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका सीमा कोरवलीकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करा. मित्र मैत्रिणींशी मिळून मिसळून रहा, असे मत व्यक्त करत त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख अतिथींचा परिचय मधुरा छत्रे यांनी करून दिला व अतिथींचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शीतल जालीमिंचे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश सरवदे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना बिस्किटे व गोड शिऱ्याचा खाऊ देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR