उदगीर : बबन कांबळे
तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून उदगीर शहरासह ग्रामीण भागात असलेल्या परीक्षा केंद्राच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्हाधिकारी यांनी राबविलेल्या कॉपीमुक्त उपक्रमाला खो देत प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तालुक्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त पथक फिरत नसल्याने तालुक्यात दिसून येत नाही त्यामुळे कॉपीचा सुळसुळाट होत आहे.
उदगीर तालुक्यातील जे कॉपी मुक्त पथक कार्यरत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यांच्या पाठीमागे पालककिंवा त्यांचा मित्र परिवार नकला पुरविण्याच्या नादात परीक्षा केंद्रावर गोंधळ घालत आहेत. पेपर सुरू झाल्यास पंधरा ते वीस मिनिटात मोबाइलच्या माध्यमातून पेपर बाहेर येत असून बाहेर संबंधित शाळेचे शिक्षक कॉपीकरून त्यांचे मायक्रो झेरॉक्स करून आपल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात व्यस्त आहेत. नियमानुसार परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राजवळ असलेले झेरॉक्स सेंटर बंद ठेवायला पाहिजे परंतु एका कॉपीसाठी आगाऊ पैसे घेऊन विद्यार्थी पालकांची लूट केली जात आहे. सांबांधित झेरॉक्स सेंटरवर कार्यवाई करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे.
उदगीर तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे तालुक्यात नावापुरते प्रवेश असून नीट सारख्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी लातूर-पुणे येथे ठेऊन परीक्षा मात्र उदगीर शहर व तालुक्यात देत आहेत. सदर विद्यार्थी हे आर्थिक बाबीत सदन घरचे असल्याने परीक्षेत कार्यरत असलेले शिक्षक या विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर हुशार असूनही अन्याय होत आहे अशा उदगीर तालुक्यात उपद्रवी परीक्षा केंद्रावर कार्यवाई करावी उदगीर तालुका कॉपी मुक्त करावा अशी मागणी होत आहे.