लातूर : प्रतिनिधी
भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी राज्यसभा सदस्य, इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते कॉ. सिताराम येचुरी यांना लातूरमध्ये हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ. सीताराम येचुरी यांच्या जाण्याने केवळ डाव्या लोकशाही पुरोगामी आघाडीचीच हानी झाली. असे नाही तर देशाचा एक अभ्यासू, संयमी, सर्व समावेशक धोरणी, ध्येयवादी नेता आपण गमावला असे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवराने मनोगतात व्यक्त्त केले.
यावेळी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. दत्ता सोमवंशी, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, शेतकरी कामगार पक्षाचे भाई उदय गवारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, कॉ. विश्वंभर भोसले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सुधाकर शिंदे, भटक्या विमुक्त्त संघटनेचे प्रा. सुधीर आनवले, अॅड. वसंत उगले, प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, अॅड. सुशील सोमवंशी, प्रा. अर्जुन जाधव यांनी यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संजय मोरे, डॉ. अजित जगताप, आनंद अडसुळे, गजानन भोसले, भीमराव लटपटे, राजेंद्र विहिरे, आत्माराम कारागीर, डॉ. सुरेश कातळे, दत्ता राऊतराव, डॉ. डी. पी. कांबळे, डॉ. विक्रम गिरी, जीवनराव देशमुख, सुधीर देशमुख, डॉ. अशोक गायकवाड, अॅड. वसंत उगले, प्रा. अर्जुन जाधव, सदाशिव अभंगे, निशांत वाघमारे, विवेक जगताप, डॉ. ज्ञानदेव राऊत यांच्यासह लातूर जिल्ह्यातील व शहरातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक संघटनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संजय मोरे यांनी केले.