24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोट्यवधींचा डांबर घोटाळा

कोट्यवधींचा डांबर घोटाळा

एकच बिल अनेक ठिकाणी जोडून कोट्यवधी रु. लाटले

– जयंत पाटील यांनी केला विधानसभेत पर्दाफाश

मुंबई : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेणारी आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये आहेत व या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा डांबर घोटाळा केला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी विधानसभेत याचे पुरावेच सादर केले.

जयंत पाटील यांनी आज विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाच्या सरकारमधील एका मंत्र्याचा वरदहस्त असलेल्या कंपनीने केलेल्या घोटाळ्याची ३ प्रकरणांचा तपशीलच जयंत पाटील यांनी दिला. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले. या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणा-या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबाराच्या बिलाचा नंबर एकच आहे. याचाच अर्थ या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.

दुस-या प्रकरणात नेवरे भांडारपुळे रोड या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपिंग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक आणि रत्नागिरी पाणीपुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेलपर्यंत जाणारा अ‍ॅप्रोच रस्ता पुनर्डांबरीकरणाचे केलेल्या कामाचा डांबराच्या बिलाचा नंबरदेखील सारखाच आहे. म्हणजेच या दोन्ही कामांसाठीदेखील एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे. एप्रिल २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक १ यांनी निवळी जयगड या रस्ता कामासाठी वापरून संपवलेली डांबराची बिले आणखी २ कामांसाठी लावली गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR