17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीकोठा गावाला पुराच्या पाण्याने वेढले!

कोठा गावाला पुराच्या पाण्याने वेढले!

बचावासाठी घेतला मंदिराचा आसरा

परभणी : प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील कोठा येथील देगांव तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून संपूर्ण दलित वस्ती पाण्याखाली आली आहे.जवळपास ५० घरांमध्ये पाणी भरले आहे.पाण्याचा वाढता ओघ लक्षात घेता महिला व मुलांनी जीव वाचविण्यासाठी जवळच्या टेकडीवरील खंडोबा मंदिर व तांड्याचा आसरा घेतला आहे. ४० वर्षांनंतर ही परिस्थिती उद्भवली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगीतले जाते आहे.

२८ तास संततधार

शनिवार व रविवार दोन दिवसांत २८तास अतिवृष्टी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली.
शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने सलग २८तास कोसळण्याचा विक्रम केला आहे. गावानजिक असलेल्या देगांव तलावाच्या सांडव्यावरून पाणी उलथत असल्यामुळे गावाच्या दोन्ही बाजूंनी वाहणारे ओढे ओव्हरफ्लो होवून गावकोस ओलांडून पाणी दलितवस्तीत शिरले.अनेकांचे संसार उघड्यावर आले.रविवारी साडेआठ पर्यंत पावसाचा धडाका सुरू असल्यामुळे ग्रामस्थांनी जमेल तेवढे घरातील सामान अन्यत्र हलवून मुलाबाळासहित गावनजिक टेकडीवरील ख़ंडोबा मंदिराचा आसरा घेतला.

८०% पीकांचे नुकसान
मागील एक महिन्यापासून परीसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे या भागातील ८० टक्के पीके पिवळी पडून जागेवरच वाळली आहेत.प्रशासनाने या भागातील पिकांची पाहणी करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे या आधीच करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR