19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोणी घेतली निवडणुकीतून माघार; उमेदवारांची यादी

कोणी घेतली निवडणुकीतून माघार; उमेदवारांची यादी

मुंबई : मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून, इतर नेतेही आता वादळी सभांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत.
यादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीकडे बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान होते. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. त्यातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी मागे घेतले आहेत त्यांची नावे जाणून घ्या.

१) अंधेरी पश्चिम येथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशोक जाधव यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे.

२) औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.
३) पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात देखील महायुतीला यश आले आहे. भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.
४) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. बीड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर, तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर आहेत.

५) तुळजापूरमधील काँग्रेसचे बंड शमले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूरमधून उमेदवारी न मिळाले बंडाचा झेंडा फडकत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचे राणा जगजितसिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यातील लढत निश्चित आहे.

६) शिवसेनेने देवळाली मतदारसंघात दिलेला एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राज्यश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राजश्री अहिरराव कालपासून नॉट रिचेबल होत्या.
शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठक होऊन निवडणूक अधिका-यांना उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या. देवळालीप्रमाणे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही धनराज महाले यांचीही अधिकृत उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली.
७) तुमसर येथून मधुकर कुकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
८) अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन यांनी माघार घेतली. झिशान हुसैन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचितमध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहेत.

९) रायगड – अलिबागमधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
१०) सांगली – मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर सी आर सांगलीकर, मोहन व्हनखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब व्हनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
११) नाशिकमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अपक्ष बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनी आपला उमेदवारी घेतली मागे घेतला.
१२) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माघार, मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतला.

१३) दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे धनराज महाले यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, वेळेवर एबी फॉर्म घेऊन नरहरी झिरवळ यांना दिले होते आव्हान.
१४) नाशिक पश्चिममधून कामगार नेते माकपचे डॉ. डी. एल. कराड यांची माघार. संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतली माघार.
१५) चोपडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंडखोर उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांची माघार
मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता असून शरद पवारांसोबत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने मी माघार घेत असल्याची जगदीश वळवी यांची माहिती
१६) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपश्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर.

१७) भाजपाचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी घेतली माघार.
भाजपाने उमेदवारी दिली नाही,म्हणून शिवाजी डोंगरे यांनी दाखल केली होती उमेदवारी.
१८) नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी घेतली माघार.
१९) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रणजित पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना फॉर्म मागे घेतला. शरद पवार यांच्या शिष्टाईला यश. शरद पवार यांनी रणजित पाटील यांना फोन केला होता.
…….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR