25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयकोलकाता निर्भया प्रकरणावर ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दु:ख, मागितली माफी

कोलकाता निर्भया प्रकरणावर ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दु:ख, मागितली माफी

कोलकाता : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी तृणमूल छात्र परिषदेचा स्थापना दिवस पीडितेला समर्पित करत आहे. आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जलद न्याय मिळण्याची आशा करतो. अमानवी घटनांना बळी पडलेल्या सर्व वयोगटातील महिलांसोबत आमची सहानुभूती आहे, सॉरी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे जोर दिला की विद्यार्थी आणि तरुणांची सामाजिक भूमिका मोठी आहे.

कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही डॉक्टरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, समाज आणि संस्कृती जागृत ठेवत नवीन दिवसाची स्वप्नं दाखवणं आणि नव्या दिवसाच्या उज्ज्वल संकल्पाने सर्वांना प्रेरित करणे हे विद्यार्थी समाजाचे काम आहे. आज मी सर्वांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करते. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, निरोगी राहा आणि उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध राहा. याच दरम्यान, भाजपाने शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ १२ तासांच्या ‘बंगाल बंद’ची हाक दिली आहे.

कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रदर्शनाला ‘नबन्ना अभियान’ असं नाव देण्यात आलं आहे. आज बंगालमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. भाजपा बंददरम्यान नादियामध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR