16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात बस जळून खाक, १ ठार

कोल्हापुरात बस जळून खाक, १ ठार

कोल्हापूर : कोल्हापुरात खासगी बसला आग लागल्याने एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेळगावहून पुण्याला जात असताना बसने पेट घेतला. यात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती समजते.
बेळगावहून पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली. यामध्ये एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला.

पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ-शिरगाव ते उजळाईवाडी दरम्यान शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हा ‘बर्निंग बस’चा थरार घडला. या भीषण दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य सहा प्रवासी सुदैवाने बचावले. आग लागताच बसचालक व सहायक घटनास्थळावरून पसार झाले.

गोकुळ शिरगाव येथे बस येताच अचानक इंजिनने पेट घेतला. इंजिनला आग लागल्याचे पाहताच चालक आणि सहायकाने घटनास्थळावरून पलायन केले. बसमधील प्रवासी गडबडीने खाली उतरले. मात्र, एक प्रवासी झोपेत असल्याने बसमध्येच अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR