22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर जिल्ह्यात २७० पथकांची नजर

कोल्हापूर जिल्ह्यात २७० पथकांची नजर

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात ८५ भरारी पथके आणि ११९ स्थिर सर्वेक्षण अशा एकूण २७० पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्थ जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमलेले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. व्हीडीओ सर्वेक्षण पथकांची संख्या ४५ असून, २१ व्हीडीओ पाहणी पथके कार्यरत आहेत.

विविध प्रक्रियांचे चित्रीकरण
जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १० विधानसभा मतदारसंघांत मिळून निवडणूक कालावधीत भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीडीओ), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष हेदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील या कामात मदत घेतली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR