रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळगाव येथील गीतांजली केशव दुड्डे या युवतीने प्रतिकुल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटी, कष्टाच्या जोरावरच एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
गीतांजली दुड्डे यांचे मूळगाव कोळगाव असुन यांचे प्राथमिक शिक्षण कोळगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री शैल्य मलिकार्जुन विद्या मंदीर समसापूर येथे झाले तर पदवी श्री साई कॉलेज लातूर, इंजनिअंिरग जवाहर लाल नेहरु इंजिनिअंिरग कॉलेज औरंगाबाद येथे झाले. गितांजलीचे वडील केशव महादू दुड्डे व आई सौ.सुनिता केशव दुड्डे यांनी मुलीला जिद्दीने शिकविले. यात गावातीलच दिपक संपत्ते यांच्याशी लग्नही करुन दिले. दिपक हे पुणे येथील एका कंपनीत नोकरीला होते. कोरोनाच्या काळात ते गावी आल्याने गीतांजलीच्या वडिलांनी शिक्षणासाठी जावयाकडे आग्रह धरला आणि जावयानेही क्षणाचा विलंब न करता परवानगी दिली.
अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीला सासुबाईकडे सोडून आई वडिलांनी इ. स.२०२१ साली पुणे येथे अॅडमिशन घेऊन दिवस- रात्र ‘एक करुन १७ घंटे लायब्ररीमध्ये राहून अभ्यास केला.नंतर एमपीएससीची परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षकपदी उत्तीर्ण झाल्या. गीतांजलीचे दि ६जून २०२४ ला नवी मुंबई येथें त्यांचे ग्राउंड झाले. त्यांना या शिक्षणासाठी आई,वडील ,पति, सासू, सासरे व पाठराखा भाऊ यांची खुप मदत मिळाली. त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.