27.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणीकौसडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कौसडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कौसडी : दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या ध्येयाच्या प्राप्तीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जिंतूरद्वारा वर्षभर आयोजित शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या व सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा जिंतूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमांमध्ये तालुकास्तरीय गणितीय पाढे, मराठी व इंग्रजी शब्द पाठांतर, खो-खो क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावणा-या कौसडी शाळेतील सर्व खेळाडूंचा, तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान गटशिक्षणाधिकारी पोले यांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये कौसडी शाळेला १० ट्रॉफी व २० प्रमाणपत्र प्राप्त झाले. याप्रसंगी कौसडी केंद्रप्रमुख प्रकाश पांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR