28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeसोलापूरखंडणीसाठी युवकाचे अपहरण, सहा आरोपी गजाआड

खंडणीसाठी युवकाचे अपहरण, सहा आरोपी गजाआड

अक्कलकोट : गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांनी वातावरण तापले आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. १३ लाख रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून एका २४ वर्षीय तरुणाला कारमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ३ तासांत ६ जणांना पकडले. न्यायालयापुढे हजर केले असता आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

राजू उर्फ बाळासाहेब श्रीशैल वाघमोडे हे फिरण्यासाठी फत्तेसिंह मैदानात गेले होते. तेव्हा आरोपी कारमधून त्या ठिकाणी आले आणि फिर्यादीकडे १३ लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास नकार केल्यावर वाघमोडे याला शिवीगाळ, दमदाटी करत गाडीत डांबून त्याचे अपहरण केले. याबाबत माहिती मिळताच अक्कलकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 3 तासांत वागदरीजवळ कार पकडली.

पोलिसांनी अपहरण करणाऱ्या ६ जणांना पकडून त्यांच्या तावडीतून वाघमोडे याची सुटका केली. त्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावर राहुल कांबळे, मंजुनाथ गुंजले, राजपाल निकम, अभिषेक डोणे, समीर पटेल, नागराज शारप्पा गुंडूर यांच्यासह ८ जणांवरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

फत्तेसिंह मैदानात वाघमोडे याचे अपहरण होत असताना तो वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. मात्र, हत्यारांच्या भीतीने कुणीही पुढे आले नाही. याबाबत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. परंतु, त्यात सहा जणांना अटक करण्यात यश मिळाले असून मुख्य आरोपी पांडुरंग उर्फ पांड्या शिंदेसह एकजण सापडला नाही. जखमी वाघमोडेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR