21.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूरखते, बियाणांचा काळा बाजार केल्यास कारवाईचा इशारा

खते, बियाणांचा काळा बाजार केल्यास कारवाईचा इशारा

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगाम महिनाभर राहिल्याने जिल्हयातील खत, बी-बीयाणे, औषध  विक्रेते डिलर आणि कृषि विभाग यांची  लातूर जिल्हा परिषदेच्या यवशंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत खते, बी-बीयाणे यांचा काळा बाजार केल्यास  अथवा लिंकींग केल्याचे दिसून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषि विभागाने यावेळी दिला आहे.
कृषि विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हा अधिकक्षक कृषि विकास अधिकारी रमेश जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषि अधिकारी काळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी लाळगे, तालुका कृषि अधिकारी, खत, बियाणे, औषध कंपनिचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.   शेतक-यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, त्या पिकांवर येणारे रोग आणि त्याअनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कृषि विभागाने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या  होत्या.  त्यानुषंगाने कृषि विभागाच्या बैठकीत खते, बी-बीयाणांच्या उपलब्धते संबधीत आढावा घेण्यात आला. खत, बियाणे विक्रेते दुकानदारांनी ई-पॉस व प्रत्यक्ष उपलब्ध साठा सारखा ठेवण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR