16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीखरदडीतील घरफोडीत ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास

खरदडीतील घरफोडीत ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास

जिंतूर : तालुक्यातील खरदडी गावात काही दिवसांपूर्वीच मंदीरातील मुर्तींचे दागिने अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना ताजी असतानाच दि.६ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास गावात घरफोडीची घटना घडली. यामध्ये सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

जिंतूर तालुक्यातील खरदडी येथील ग्रामस्थ अनील विठ्ठल राठोड यांनी या संदर्भात् पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की. फिर्यादी व त्यांच्या परिवारातील मंडळी दि.५ ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेले. दि.६ ऑगस्ट पहाटे ५च्या सुमारास फिर्यादीच्या पत्नी उठल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. पत्नीने फिर्यादीला उठविले असता घरातील लोखंडी पेटी चोरीला गेल्याचे दिसून आले. चोरट्याने घरातील एकदाणी, सेवणपीस, दंडकडे, पायातील चैन आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे म्हटले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनास्थळी पो.नि.बुध्दराज सुकाळे यांच्या पथकाने भेट दिली. यावेळी श्वानाने गावाबाहेर असलेल्या रस्त्यावरील एका शेतात जाऊन घुटमळला. त्या ठिकाणी एक रिकामी पेटी आढळून आली. चोरट्यांनी त्यातील दागिने घेऊन पेटी फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस बीट जमादार जक्केवाड करत आहेत. दरम्यान खरदडी गावातील मंदिरातील मातेच्या दागिन्याची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच गावात चोरी झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा व चोरट्यांचा तात्काळ शोध घ्यावा म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR