अकोला : प्रतिनिधी
आता खराब रस्ता असलेल्या गावांत बस सेवा होणार बंद.. अपघात आणि एसटीचं नुकसान टाळण्यासाठी ‘एसटी डेपो’ महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अकोल्यातल्या खड्डेमय रस्ते असलेल्या २ गावांना अकोला एसटी आगाराकडून सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फे-या रद्द करू, असा थेट इशारा एसटी आगाराने २ ग्रामपंचायतला पत्राद्वारे दिला आहे.
अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला अकोला एसटी आगाराने पत्र देत एसटी बस फे-या रद्द करण्याचं कळवलंये. अकोल्यातल्या धामणा ते हातरून या १० किमी अंतराचा पूर्णत: खड्डेमय झालाय. त्यामुळं वर्षभरातचं एसटी बसचे मोठे नुकसान होते तसेच या खड्डेमय रस्त्यांवरून धावताना अपघाताचीही भीती तितकीच जास्त राहते. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय. यासाठीच अकोला ‘एसटी डेपो’ने मोठे पाऊल उचलायला सुरुवात केली. खराब रस्त्यांची यादीतील गावांना एसटी महामंडळाकडून हटवली जात आहे.
अकोल्यातल्या ‘धामणा’ आणि ‘बोरगाव वैराळ’ या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या गावातील बससेवा बंद होण्याची शक्यता आहे. बस सेवा बंद करण्याचा इशाराही ‘अकोला एसटी डेपो’ने दोन्ही ग्रामपंचायतीला दिला आहे. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फे-या रद्द करू, असा पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आलेत. त्यानंतर दोन्ही गावच्या गावक-यांसह ग्रामपंचायतिला मोठा धक्का बसला आहे.