22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeलातूरखरोळा शिवारातून गुटख्याचा २ लाखांचा साठा जप्त

खरोळा शिवारातून गुटख्याचा २ लाखांचा साठा जप्त

रेणापूर :  प्रतिनिधी
सुगंधित तंबाखु गुटख्याचा साठा करून ठवेलेल्या शेडवर दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी जवळपास २ लाख ९५० रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी खरोळा (ता. रेणापूर) शिवारात मंगळवारी केली. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पांढरी (ता. रेणापूर) गावातील दोघांनी खरोळा शिवारातील पांढरी परिसरातील शेतातील पर्त्याच्या शेडमध्ये सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत लातूर येथील दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर दशतविरोधी पथकातील  परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक राजश्री तेरणे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, उत्तम जाधव, युसफ शेख, विशाल गुंडरे, दिपक वैष्णव यांच्या पथकाने अचानकपणे शेतातील शेडवर छापा मारून. या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटख्याचा साठा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्येमाल सदरील पथकाने जप्त केला . यावेळी बालाजी गणपती ठोंबरे वय ६५ वर्षे  रा पांढरी  ता. रेणापूर) याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पथकांने घटना स्थळाचा पंचानामा केला .
दहशतवादविरोधी शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  गुरंन ४१६ / २४ कलम १२३ , २७४ ‘ २७५ , २३  बी .एन .एस अन्न सुरक्षा व मानदेकायदा २००६ चे कलम २६ (२) ३० (२) अन्वये  रेणापूर पोलीस ठाण्यात बाप- मुलाविरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास रेणापूर पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक आर. एस .जाधव  हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR