24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरखाजगी बसने दोन दुचाकी चालकास चिरडले

खाजगी बसने दोन दुचाकी चालकास चिरडले

लातूर : प्रतिनिधी
ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत खाजगी बस चालकाने स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि. १८ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी  चालकास धडक देत खाजगी बसच्या समोरील टायरखाली एका दुचाकीला  चिरडले तर दुस-या दुचाकीला समोरील बाजूने ठोकरले यात एकास डोकाला गंभीर मार लागला असुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामदास पंढरी ताकपडे वय २६ राहणार मोळवण ता. अहमदपूर सध्या हरिभाऊनगर लातूर हे आपली रात्रपाळीचे काम संपवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुध घेण्यासाठी एमएच २४ एआर ५१०६ या क्रमांकाच्या दुचाकीवर थांबले असताना पुणे- अहमदपूर- लोहा- कंधार जाणारी एमएच ०४ जी एफ ६६६९ खाजगी बस दुस-या खाजगी बसला ओव्हरटेक करत या  दुचाकीला धडक देऊन चिरडली तर समोरच चौकात वळण घेऊन बौद्धनगर येथे वळत असलेले महादेव कांबळे वय अंदाजे ५५ हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच २४ एसी ९०६३ वरुन जात असताना या बसने ठोकरले आहे. यात महादेव कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR