लातूर : प्रतिनिधी अहमदपूर तालुक्यातील खानापूर येथे येथील शेतकरी शिवानंद विठ्ठल देशपांडे यांचे शेत शिवार गट क्रमांक ८५ मध्ये ३ हेक्टर ४८ आर जमीन असून या जमिनीमध्ये सदर शेतीमध्ये चार बॅग हरभरा पेरला होता. हा हरभरा गोळा करून या हरभ-याची मोठी गंज या शेतक-याने शेतात लावून ठेवलेली होती. सदर हरभ-याची गंज तिघा जणांनी संगणमत करून जाळली असून यात १ लाख २० हजाराचे नुकसान झाले असल्याची घटना घडली असून याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील खानापूर येथे शिवानंद विठ्ठल देशपांडे यांची शेती असून सदर शेती भागीन व्यंकटी खांडेकर हे करतात. खानापूर शिवारातील गट क्रमांक ८५ मध्ये ३ हेक्टर ४८ आर जमिनीत शेतक-याने हरभ-याच्या चार बॅगा पेरलेल्या होत्या दरम्यान हरभरा वाळला असता सदर हरभरा काडून त्याची शेतातच गंज तयार करून शेतक-यांनी ठेवली होती. २८ फेब्रुवारी दरम्यान मध्येरात्री सदर हरभ-याची लावल्याली गंज जाळली असून यामध्ये १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शिवानंद विठ्ठल देशपांडे यांनी सदर गंज आजूबाजूच्या शेतकरी दत्ता खांडेकर यांचे चुलते सखाराम खांडेकर यांना विचारपूस केली. मात्र माहिती मिळू न शकल्याने दि. १ मार्च रोजी किनगाव पोलीस ठाण्याची माहिती देऊन २ मार्च रोजी सकाळी अंदाजे दहा वाजण्याच्या दरम्यान तलाठी संतराम वैद्य यांनी सदर जळालेल्या हरभ-याच्या गंजचा पंचनामा केला.
शिवानंद देशपांडे हे खानापूर गावातील दूध डेरीपाशी थांबलेले असताना गावातीलच कोंडीराम देविदास शिंदे, कालिदास कोंडीराम शिंदे व राजकुमार साहेबराव शिंदे हे तिघे येऊन आम्ही तुझी पूर्वी सोयाबीनची गंज जाळलो होतो. त्याच काही झाले नाही. आता हरभ-याची गंज जाळली आहे. आता काय होणार म्हणून शिवानंद देशपांडे यांच्याकडे पाहून हसू लागले त्यामुळे सदर हरभ-याची गंज यांनीच जाळल्याचे देशपांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे कोंडीराम देविदास शिंदे. कालिदास कोंडीबा शिंदे, राजकुमार साहेबराव शिंदे सर्व राहणार खानापूर तालुका अहमदपूर यांनी गंज जाळून १ लाख २० हजार रुपयाचे नुकसान केले आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात तिघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास किनगाव पोलीस करत आहेत.