30.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रखासदार गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

खासदार गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नितीन खर्जुल यांच्यावर एका गटाने प्राणघात हल्ला केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

रविवारी मध्यरात्री मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या पाठोपाठ नाशिक रोडलाही शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे नाशिक रोड परिसरात तणावाचे वातावरण होते.

सिन्नर फाटा भागातील रवींद्र गाढवे याचा वाढदिवस साजरा करण्यावरून हा वाद झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला जात होता. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे माजी नगरसेविका खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांनी त्यांना हटकले. या वादातून रवींद्र गाढवे आणि भाऊ संदीप गाढवे यांनी आपल्या सहका-यांसह खर्जुल यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. खर्जुल हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR