वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे स्वीय सहायक अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस आली आहे. या कंपनीशी संबंध नसून या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही, असे स्पष्टीकरण खासदार भावना गवळी यांनी दिले आहे.
खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे स्वीय सहायक असलेले अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे. भावना गवळी यांनी यावेळी सांगितले की, माझा या कंपनीशी काहीही संबंध नाही, मी कधीही या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे स्वीय सहायक अशोक महाजन गांडुळे यांच्या नावे असलेल्या भावना अग्रोटेक कंपनीमध्ये खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यातून भावना अग्रोटेकमध्ये पैसे वळते करून घोटाळा केला. याच घोटाळ्याची तक्रार भावना गवळी यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दिली आहे.
भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे स्वीय सहायक असलेले आणि त्यांचे जवळील लोक, सीए अशोक मुळे यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. कंपनीशी संबंध नाही, कंपनीत कुठल्याही पदावर नव्हते, असे भावना गवळी यांनी सांगितल.
भावना गवळी यांनाही आयकर विभागाची नोटीस
खासदार भावना गवळी यांच्यावर याआधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचे चित्र होते. मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक खाते गोठवले असल्याची माहिती आहे.