लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना ली. च्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची सोमवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी बाभळगाव निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि माजी खासदार रजनीताई पाटील यांच्यात विविध विषयांवर चर्चा पार पडली. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री अशोकराव पाटील, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, आदित्य पाटील यांची उपस्थिती होती.