31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रखासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू

खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू

पुणे : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणा-या साडेसातशे मीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तो रस्ता काँक्रीटचा करण्यात यावा, या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मागील तीन तासांपासून उपोषण करीत ठिय्या आंदोलनास बसल्या आहेत. तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास आले नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानते. पण भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडेसातशे मीटरचे आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून तो रस्ता करण्यात यावा, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.ही दुर्दैवी बाब असून त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग अवलंबून कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनास बसले आहेत.

तसेच जोवर रस्त्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणाहून उठणार नाही. भले ३० तास का होईनात,अशी भूमिका मांडत राज्य सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. लाडक्या बहिणीच्या मतदारसंघात भावाचे लक्ष नाही का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते मला माहिती नाही आणि मी या ठिकाणी केवळ बनेश्वर येथील रस्त्याचा प्रश्न सुटला जावा, या मागणीसाठी उपोषणास बसले असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR