पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यासमोर ठिय्या मांडला होता. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणारे रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे.
सातत्याने पाठपुरवठा करून प्रशासनाकडून आश्वासन मिळत असल्याने सुप्रिया सुळे यांना थेट उपोषणाला जाऊन बसल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री आणि पालकमंर्त्यांचा दबाव असल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता.
सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या सीओंनी आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि आता काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी उपोषण मागे घेतले आहे गेल्या सात तासांपासून कडक ऊनहामध्ये उपोषण सुरू होते. अखेर त्यांनी आता उपोषण मागे घेतले.