18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसोलापूरखा. प्रणिती शिंदे यांनी फोर्टिफाइड तांदळाबाबत माहिती व्यवस्थित समजावून घ्यावी : आ.सचीन कल्याणशेट्टी

खा. प्रणिती शिंदे यांनी फोर्टिफाइड तांदळाबाबत माहिती व्यवस्थित समजावून घ्यावी : आ.सचीन कल्याणशेट्टी

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथे रेशन दुकानात प्लास्टिक तांदळाचे वाटप करण्यात आले असून, तो शिजत नसल्याचा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला. याला उत्तर देताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले, खा. प्रणिती शिंदे यांनी फोर्टिफाइड तांदळाबाबत माहिती व्यवस्थित समजावून घ्यावी. गरोदर माता, लहान मुलांना पोषक असलेले नेहमीच्या तांदळामधीलच हे एक प्रकारचे तांदूळ आहेत. तुम्ही तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे जबाबदारीने बोला. चुकीचे विधान करू नका. याबाबतीत आपला अज्ञानीपण तपासून घ्या, घाईघाईने नेहमीप्रमाणे बेताल वक्त्तव्य करू नका.

सोलापूर विमानतळाचे काम यापूर्वीच झाले आहे. विमानसेवा कधी सुरू करणार ते सांगा. सध्या जनतेला केवळ वेड्यात काढायचं काम होत आहे, असा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी चपळगाव येथील कार्यक्रमात केला होता. त्यांच्या आरोपाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपण मंबईला राहता, तेव्हा अगोदर सोलापूरची विमानसेवा नीट समजून घ्या, असे उत्तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दीले आहे.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते कुरनूर येथे जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर चपळगाव येथील कार्यक्रमात खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या, स्थानिक आमदारांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव, दहशत आहे. तुम्ही घाबरू नका.

चुकीचे काम करत आमच्या लोकांना त्रास दिला तर तुमची बदली लांब पल्ल्याच्या जिल्ह्यात करू आणी माझी, तुमची गाठ यावर उत्तर देताना
आ. कल्याणशेट्टी म्हणाले एअरपोर्टबाबत सिस्टीम समजावून घ्या. यापूर्वी काय होतं, आता त्यात बरेच काम होऊन विमान उडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आपण मुंबईल राहता, लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. तुमची सोय होणार आहे चुकीचं स्टेटमेंट देऊन लोकांना भ्रमित करू नका असेही आमदार कल्याणशेट्टी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR