नांदेड: प्रतिनिधी
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश बांगर यांनी एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विमानतळ पोलिस ठाण्यात २९/२०२१ घटना क्रमांक १०३/२२१ कलम ३०२, ३२३,३४ याप्रमाणे खून प्रकरणातील गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी चंद्रकांत उर्फ बाळ्या शामराव तारू वय २१ वर्षे रा. वसंतनगर नांदेड यास अटक करून तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तपास करून न्यालयात दोषारोप पत्र दाखल केले.
साक्षी पुराव्याअंती दोषी ठरलेल्या चंद्रकांत उर्फ बाळ्या शामराव तारू वय २१ यास १९ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. बांगर यांनी कलम ३०२ मध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा तर कलम ३२३ मध्ये १ हजार रुपये दंड व एक वर्षे करावासाची शिक्षा ठोठावली. पोलीस निरीक्षक गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरव अधिकारी म्हणून पो. कॉ. विभुते यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील कोकाटे यांनी काम पाहिले आहे.