20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरख्रिसमसने बाजारपेठेत भरला उत्साह

ख्रिसमसने बाजारपेठेत भरला उत्साह

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ख्रिसमसचा सर्वत्र उत्साह वाढत असून बाजारात खरेदीला वेग आला आहे. ख्रिश्चन बांधवाचा हा हर्षोल्हासाचा सण असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. शहरातील चर्च विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाले आहेत तर इतरांपेक्षा आपले घर वेगळे कसे दिसेल म्हणून महिला, मुले घरांची सजावटीमध्ये व्यस्त आहेत. ख्रिसमसनिमित्त आकर्षक ग्रीटिंग व क्रिसमस गीफ्ट बाजारात उपलब्ध झाले आहेत.
ख्रिसमस सणामध्ये सांताक्लाजला खूप महत्त्वाचे स्थान असते. सांताक्लाज आपल्या घरी यावा, अशी प्रत्येकाची मनीषा असते. यंदा गीफ्ट निर्मात्या कंपन्यांनी गीफ्ट रुपात सांताक्लाज बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. चीनी माती मग आकर्षक स्वरूपात तयार करण्यात आला आहे. त्याच्या हॅन्डलवर सांताक्लाजच्या डोके लावले आहे. उर्वरित ठिकाणी सांताक्लाज व क्रिसमस ट्रीज तयार करण्­यात आले असल्याचे दिसून आले. सेलिब्रेशन कोणतेही असो त्यात ग्रीटिंगने आपले स्थान कायम ठेवलेले असते.
आपल्या सहकारी, नातेवाईन यांना भेट वस्तू व आकर्षक ग्री­टिंग देऊन सणाचा आनंद द्विगुणीत केला जात असतो. ख्रिसमस सणामध्ये ही याचे महत्त्व आहे. आकर्षक ग्रीटिंग मोठया प्रमाणात बाजारात दाखल झाले आहे. म्युझिकल ग्रीटिंग कार्ड यंदाचे खास आकर्षण ठरले आहे. यांची किंमत १० पासून ते १६० रुपये आहे. बाजारात आलेल्या आकर्षक सांताक्लाज लहान मुर्तींनी लक्ष वेधले आहे. त्यासोबत ख्रिसमस ट्री, फ्रेम तसेच विविध गीफ्ट आर्टिकल्स बाजारात दाखल झाले आहे. शहरातील विविध भागांत सांता टोपी विक्रीची दुकाने गेल्या काही दिवसांपासून विकीत्यांनी थाटली आहेत. आकर्षक अशा विविध प्रकारचे कँडल बाजारात दाखल झाल्या आहेत. यात फ्लोटिंग कँडल, डेकोरेटिव्ह कँडल, सुवासिक, चंदनयुक्त कँडल, जेलिटेप, स्टँड विथ कँडल यांसह हार्डशेप आणि लायटिंग कँडल बाजार उपलब्ध झाले आहेत.
ख्रिसमस नाताळ सणात कँडलला विशेष महत्त्व असल्याने त्यास चांगली मागणी असल्याचे व्यापारी दौलत नांगरे यांनी सांगितले. ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपेक्षा अधिक किमतीत हे आकर्षक कँडल मिळत असून आकर्षक अशा ख्रिसमस-ट्रीला मोठी मागणी आहे. मदर मेरी, जीझस, सांताक्लॉज अशा विविध आकारांच्या आकर्षक मूर्तींना विशेष मागणी आहे. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणा-या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची हातोहात विक्री होत असल्याचे विक्रीत्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR