22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeमहाराष्ट्रगंगापूर तालुक्यात चार मुले बुडाली

गंगापूर तालुक्यात चार मुले बुडाली

ट्रॅक्टर धुवायला गेलेल्या चौघांवर काळाचा घाला
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे अंत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथील एका तलावात बुडून ४ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. दस-याच्या निमित्ताने सर्व मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी लिंबेजळगाव तलावातील बॅकवॉटरमध्ये गेले होते, यावेळी एकापाठोपाठ एक असे चारही मुले पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुर्घटनेत बुडालेली ही सर्व मुले ९ ते १७ वर्षांमधील होती, या घटनेने परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

बुडालेल्या मुलांमध्ये व्यंकटेश दत्तात्रय तारक (११), इरफान इसाक शेख (१७), इम्रान इसाक शेख (१२) आणि जैनखान हयात खान पठाण (९) यांचा समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दस-याच्या सणादिवशीच मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR