16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरगंजगोलाई गोरगरीब शॉपिंग मॉलमध्ये व्यापारी, ग्राहकांना सुविधा उपलब्ध कराव्यात 

गंजगोलाई गोरगरीब शॉपिंग मॉलमध्ये व्यापारी, ग्राहकांना सुविधा उपलब्ध कराव्यात 

लातूर : प्रतिनिधी
गंजगोलाई हे गोरगरीबांचे शॉपिंग मॉल असून याठिकाणी व्यापारी आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध कराव्यात. या ठिकाणी वाहतुक व्यवस्था सुरळीत करावी, गंजगोलाईतील मोकाट जनावरे व पाणी आऊटलेटचा बंदोबस्त करावा, लातूर शहर महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मनपाने फायर फायटिंग व सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केल्या. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी गंजगोलाई मार्केट असोसिएशन व्यापा-यांची व मीनी मार्केट येथील व्यापा-यांची दि. ३१ जुलै रोजी दुपारी भेट घेऊन संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, गंजगोलाई मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रईस टाके, रमेश कोटलवार, केयुर कामदार, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन शिवकुमार पाटील रायवाडीकर, बसवंतआप्पा भरडे, शिवाप्पा पारशेटी, मिनी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष तात्या देशमुख, डावरे, शरद भोसले, प्रशांत पेंडकर, अखिल शेख, प्रकाश क्षीरसागर, नाना पत्रिके, लातूर शहर महानगरपालिकेचे झोन सीचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे, क्षेत्रीय अधिकारी झोन डी बंडू किसवे, क्षेत्रीय अधिकारी झोन बी विजय राजुरे, इमरान सय्यद, आसिफ बागवान, जाफर चौधरी, रफिक नाना, रितेश चापसी, अभिषेक पतंगे, अबू मणियार, गिरीश ब्याले, अब्दुल्ला शेख, देविदास बोरुळे पाटील, करीम तांबोळी, जम्मू मणियार, गफार पटवेकर, दगडूआप्पा मिटकरी, गोरोबा लोखंडे, लक्ष्मीनारायण नावंदर, अकबर माडजे, रणधीर सुरवसे, जहीर शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,  गंजगोलाई मार्केट असोसिएशनचे व मीनी मार्केट येथील व्यापारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की, गंजगोलाई हे गोरगरिबांचे शॉपिंग मॉल आहे.
गोलाईमध्ये खरेदीसाठी येणा-या ग्राहकांच्या वाहनांना जामर लावण्याचे प्रमाण वाढत आहे, गोलाईतील मोकाट जनावरे व घाण पाणी आउटलेटचा व्यापरी व ग्राहकांना त्रास होत आहे, त्यांचा बंदोबस्त करावा, गाळयाचे हस्तातरण फीस कमी करावी, पार्किंगचे टेंडर काढून लवकर निर्णय घ्यावा, लातूर शहर महानगरपालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स गाळे जेथे आहेत तेथे मनपाने फायर फायटिंग व सीसीटीव्ही बसवावेत, असे आदी सुचना केल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जाकीर हाजी हुसेनसाब बागवान यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR