23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरगंज गोलाई परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव कारवाई

गंज गोलाई परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव कारवाई

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर मनपाच्या वतीने गंजगोलाई परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. गांधी चौक पोलिसांच्या सहकार्यातून झालेल्या या कारवाईत १६ हातगाडे जप्त करण्यात आले. गंजगोलाई परिसरात वाहतुकीला अडथळा होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व त्यांचे सहकारी तसेच मनपाचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवी कांबळे, स्वच्छता निरीक्षक सिद्धाजी मोरे, अजय घोडके, मुस्तफा शेख व  कर्मचा-यांनी यात सहभाग घेतला. यापुढेही ही मोहीम सुरुच
राहणार असल्याचा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR