15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeक्रीडागंभीरच्या डिनर पार्टीत हर्षित राणाची खास एन्ट्री

गंभीरच्या डिनर पार्टीत हर्षित राणाची खास एन्ट्री

मुंबई : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरुद्ध १० ऑक्टोबरपासून सुरू होणा-या दुस-या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी गौतम गंभीरने त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी खास डिनर पार्टीचे आयोजन केले. ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ बसने गंभीरच्या घरी पोहोचले.

या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हर्षित राणाने. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग नसताना देखील या खासगी पार्टीसाठी हजर होता. विशेष म्हणजे, हर्षित राणा टीम बसने नव्हे, तर स्वत:च्या खासगी कारमधून थेट गंभीरच्या घरी पोहोचला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

हर्षित राणा आणि गौतम गंभीर दोघेही दिल्लीतले असल्यामुळे गंभीरने त्याला वैयक्तिकरीत्या आमंत्रित केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अलीकडेच हर्षितला ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्याने, आणि त्यावरून ‘गंभीरचा लाडका’ अशी चर्चा सुरू असल्याने, या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
गंभीर यांच्या डिनर पार्टीला भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक मंडळी, सपोर्ट स्टाफ तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. खेळाडू या पार्टीला सामान्य पोशाखात आले होते. बहुतांश जण पांढ-या टी-शर्टमध्ये होते, मात्र शुभमन गिलने मात्र वेगळेपण जपताना ‘अमीरी’ ब्रँडचा खास रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR