24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरगतीमान विकासासाठी धिरज देशमुख यांना पुन्हा संधी द्या

गतीमान विकासासाठी धिरज देशमुख यांना पुन्हा संधी द्या

लातूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्याची दुरदृष्टी आणि कर्तृत्व हे वारसाने येत असते. ते आमदार धिरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत लातूर ग्रामीण मतदार संघाचा विकास करताना दाखवून दिलेले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी घालून दिलेली विकासाची घडी विस्कटू न देता ती अधिक पक्की करण्याकरीता आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमधील विकासाचे प्रश्न थेट विधीमंडळापर्यंत नेले. त्यामुळेच या मतदारसंघात पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा, रस्ते आदी मुलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आगामी काळात यात अधिकची भर टाकुन आपला मतदारसंघ सुविधांनी सुसज्ज करण्याकरीता मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी आशिर्वाद कायम ठेवावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर तालुक्यातील मांजरी, बोडका, जवळा (बु) येथे दि. १५ संप्टेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, डॉ. सारिका देशमुख, सुनिता अरळीकर, विकास कारखान्याचे माजी संचालक गोविंदराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर तालुक्यातील मांजरी येथील जगदंबा मंदीर येथे देवीची आरती करुन शंकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी महिला बचत गटांच्या महिलांची संवाद बैठक झाली.

पुढे बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या कि, गेली दहा वर्ष आपल्या पक्षाचा खाजदार नव्हता यंदा आपल्या पक्षाचा खाजदार आपण सर्वानी निवडून दिला आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. लोकनेते विलासराव देशमुख साहेब असताना सोयाबीनला सात हजार रुपये भाव होता. आज तो चार हजार पाचशे रुपये एवढा आहे. लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देण्यापेक्षा शेतक-यांच्या मालाला योग्य भाव द्या. शंभर रुपयात गॅस सिलेंडर देऊन आज तो भरायला हजाराकराशे घेतले जातात.

ही जनतेची फसवणूक नाही का? भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक आश्वासन आपल्याला दिले आहेत. पहिल्या पाच वर्षात त्यांनी सागीतले कि, आम्ही बाहेर असलेला काळा पैसा भारतात आणू आणि गोरगरीब जनतेला प्रतेकि १५ लाख रुपये देवू मात्र आजपर्यंत या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यानंतर त्यानी दुस-या पाच वर्षात सागीतले कि, युवक-युवतीना वर्षाला २ काटो नोकरी देणार असल्याचे सांगीतले मात्र ३३ लाख नोक-या ह्या भरावयाच्या असतानाही या सराकारने युवक-युवतीना दिले नाही. त्याचबरोबर आता लाडकी बहिन योजना या सरकारने काडली आहे. मात्र ही योजना निवडणूक होई पर्यंत चालू राहणार आहे. या सरकारचे लबाड्याच अवतन आहे. त्यामुळे या सरकारच्या जाहिरातीला बळू पडू नका असे आवाहन केले.

गेल्या अनेक वर्षापासून आपन सर्वानी पाहयल आहे की, कॉग्रेस पक्षाने आपल्या लातूर ग्रामीनसह जिल्ह्याचा विकास केले आहे. पुढील काळातही आपला आशिर्वाद ग्रामीनचे लोकप्रिय आमदार धिरज देशमुख यांना द्यावा. या विधानसभेत महायुतीचे सरकार पडणार आहे. आणि आपले सरकार येणार आहे. आपन आपल्या कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहयच आहे. आपल्या आशिर्वादामुळे लोकसभेला कॉग्रेस पक्षाचा उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना १ लाख ६२ हजार अधिक मतानी खाजदार म्हणून निवडून दिलात. तोच आशिर्वाद परत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांना देण्याचे आवाहन केले.

यावेळी गावातील भारतबाई बचाटे, लक्ष्मी भालेकर, छाया सुरवसे, कीर्ती झुंजारे, विद्या कदम, वैशाली चव्हाण या महिलांनी उपस्थित मान्यवराचे स्वागत केले. प्रास्ताविक सुनिता आरळीकर यांनी केले. या प्रसंगी मांजरी येथील गुणवंत झुंजारे, नवनाथ पैलवान, चंद्रकांत बचाटे, सतीश सुरवसे, प्रशांत सुरवसे, वामन चव्हाण, बस्वराज झुंजारे, किशोर चव्हाण, कैलास झुंजारे, बापू पवार, अशोकराव चव्हाण, आबा गायकवाड, रंगनाथ कदम, भरत कदम, नामदेव पोटभरे, प्रकाश भालेकर, भारतबाई बचाटे, मुद्रीकाबाई भालेकर, मनिषा कदम, संतोष घाडगे,मनोहर कराड, लक्ष्मीबाई भालेकर यांसह बोडका येथील आदी महिलांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR