गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारत सरकार १४ वर्षांच्या मुलींसाठी विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्टस् ऑन इम्युनायझेशनने केलेल्या शिफारसींप्रमाणे सरकारने एकच डोस देण्याची पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच ही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.

या मोहिमेच्या पहिल्या ९० दिवसांत जन्म तारखेनुसार १४ वर्षे वय पूर्ण असलेल्या मुलींना सरकारी आरोग्य केंद्रांवर ही लस घेता येईल. याबरोबरच १४ वर्षे असलेल्या मुली त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी यू-विन पोर्टलवरून स्लॉट बुक करू शकतील. ही प्रक्रिया कोरोना महामारीच्या काळात को-विन पोर्टलवर करावी लागत होती. तशीच प्रक्रिया यातही करावी लागणार आहे. दरवर्षी वयाची १४ वर्षे पूर्ण करणा-या १.१५ कोटी मुली या एचपीव्ही लस घेण्यासाठी पात्र असतील. १४ वर्षे वय असताना लस देण्याचा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे की, या वयात लसीकरण केल्यास सर्वांत मजबूत आणि दीर्घकाळासाठी संरक्षण मिळते, असे अधिका-याने सांगितले.

लवकरच सुरू होत असलेल्या या लसीकरणाच्या मोहिमेत एमएसडीची गार्डासिल ही लस वापरली जाणार आहे. किमान सुरुवातीचे २ वर्षे तरी याचा वापर केला जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली या स्वदेशी बनावटीच्या लसीला अद्याप डब्ल्यूएचओची मंजुरी मिळालेली नाही. तसेच कर्वावॅक वापरून एक डोस देण्याच्या पद्धतीची परिणामकारकता अद्याप सिद्ध झालेली नाही. या लसीच्या वापराबाबतचा निर्णय नंतर घेतला जाऊ शकतो, असे अधिका-यांनी सांगितले. सध्या या लसीचे डोस कॅवी व्हॅसिन अलायन्सकडून येतील, असेही सांगण्यात आले. ही संस्था भारताला २.६ कोटी डोस पुरवेल, ज्यापैकी १ कोटी डोस आधीच भारतात दाखल झाले आहेत. उरलेले या आणि पुढच्या वर्षभरात येतील, असे सांगण्यात आले.

गर्भाशयाच्या मुखाचा
कर्करोग रोखणे शक्य
जवळपास ८५ टक्के गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग हे एचपीव्हीच्या सततच्या संसर्गामुळे होतात. भारतात महिलांमध्ये सर्वाधिक आढळणा-या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुस-या क्रमांकावर आहे. दरवर्षी सुमारे १.२५ लाख महिलांना हा कर्करोग होतो आणि त्यापैकी ७५ हजार महिलांचा मृत्यू होतो.

एचपीव्ही लसीकरणामुळे
४ मुख्य स्ट्रेन्स रोखता येणार
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे ४ मुख्य स्ट्रेन्स हे एचपीव्ही लसीकरणामुळे रोखले जाऊ शकतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे बहुतेक इन्फेक्शन्स आणि अर्थात कर्करोग टाळता योतो. २०२०-२१ मध्ये स्वीडन आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासानुसार किशोरवयात लसीकरण केल्यास वयाच्या ३० व्या वर्षांपर्यंत कर्करोगाचा धोका ८५ टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकतो. या आधी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news