22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रगळ्यात कांद्याच्या माळा घालून नेते पोहचले मतदानाला

गळ्यात कांद्याच्या माळा घालून नेते पोहचले मतदानाला

नाशिक : कांद्याच्या मुद्यावरुन शेतक-यांमध्ये प्रचंड चीड असल्याचे बघायला मिळत आहे. हीच चीड आज शेतकरी मतदार राजाने मतदान करताना देखील दाखवली आहे. गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यात बागलाणचे माजी आमदार दिपीका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेतला मतदानाच्या वेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणा-या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे मतदान केंद्रांवर काहीवेळ गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना गळ्यातील माळा काढून मतदान करण्यास रवाना केले.

कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा- छगन भुजबळ
मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान केले त्यावर अधिकारी काहीही करू शकत नाही. त्यामुळे मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही, असे करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा. जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा. मात्र, याविषयी मतदान अधिकारी काय करणार, असे म्हणत छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR