अहमदपूर : प्रतिनिधी
महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्रीहरी प्राथमिक विद्यामंदिर येथील सहशिक्षक कालिदास व्यंकटराव गांजरे यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या तालुक्यातील श्रीहरी प्राथमिक विद्यामंदिर येथे १९९३ पासून कालिदास व्यंकटराव गांजरे हे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सेवाकाळात अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे कार्य केले असून यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, इंजिनियर, शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी ठसा उमटवून नावलौकिक मिळविला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सतत प्रयत्नशील ,पालकांशी सुसंवाद ठेवणे, नवीन विविध उपक्रम राबविणे, आनंददायी शिक्षण, शांत, संयमी, विद्यार्थीप्रिय शिक्षक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. दि. ८ नोव्हेंबर रोजी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा आयोजक व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते, लातूर जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल गफार देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांना सपत्नीक महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील इतर मान्यवर व इतर शाळेतील अनेक सहकारी बांधव उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ हाडोळती येथील अध्यक्ष प्रा. पी. टी. पवार संस्थेचे सचिव डॉ. निलेश पवार यांनी संस्थेच्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार, दयानंद माध्य व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य गणपतराव कौडगावे , शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कानवटे ,बालाजी कदम व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.