29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeलातूर‘गाढवाची वरात शासनाच्या दारात’ आंदोलन

‘गाढवाची वरात शासनाच्या दारात’ आंदोलन

निलंगा :  प्रतिनिधी
निलंगा शहरातील विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने  दि १८ जुन रोजी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गाढवाची वरात शासनाच्या दारात आंदोलन करण्यात आले. निलंगा शहरातील सर्व सार्वजनिक बोर तात्काळ सुरु करण्यात यावे, शहरातील खड्डे तात्काळ मुरूम व कचने बुजवण्यात यावेत, दत्तनगर ते दादापीर दर्गा येथील नाल्या न बांधता रोड केला आहे.
तेथील दूतर्फा नाली तात्काळ बांधण्यात यावी, आठवडी बाजार येथे मुरूम व कच टाकण्यात यावा, निलंगा शहरातील औरंगपुरा व ज्या-ज्या भागातील नालीवरील पूल तुटले आहेत ते तात्काळ बांधण्यात यावेत, शहरातील रस्त्याची कामे ९० टक्के निकृष्ठ दर्जाचे झाले असून त्याची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, जुने पोलीस ठाणे व माळी गल्ली येथील नालीवरील धोकादायक खिडक्या तात्काळ बदलण्यात याव्यात, शहरातील सर्व भागात मूलभूत सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्यात आदी मागण्यासाठी प्रतिकात्मक गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन युवक काँग्रेस व नागरिकांतर्फे करण्यात आले.
    यावेळी युवक तालुका अध्यक्ष मदन बिरादार, निलंगा शहराध्यक्ष मुजीब सौदागर, तालुका उपाध्यक्ष अभिजित उसनाळे, तालुका उपाध्यक्ष राम बिरादार, गिरीश पात्रे, बाबा बिबराळे, विलास कांबळे, अमोल नवटके, विशाल कांबळे, आवेज शेख, फैसल शेख, सबदर काद्री, अमोल बिराजदार, विशाल कांबळे, जुबेर शेख, रामराव बिराजदार, अस्लम मणियार, मुजम्मील  सीतारी, अनिल पाटील, प्रशांत बिरादार, नागेश राघो, जाकीर शेख, मुश्तक शेख, नागेश राघो,  शानवाज पटेल, रफिक शेख, विश्वनाथ सूर्यवंशी, गौस सय्यद, हणमंत पाटील, शुभम पाटील, आमेर पाटेवले, अबुबकर सय्यद, जलाल फकीर शेख, सोहेल खादिम, फेरोज तुलगुरे, अफरोज तुलगुरे, बबलू पठाण, अतिक दारोगा, दशरथ उसनाळे, लखन ढगे, वैभव माने, कृष्णा पवार, शैलेश काटाळे, शरद माने, रुषी गिरी आदिसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR