31 C
Latur
Saturday, June 22, 2024
Homeसंपादकीय विशेष‘गुगल’ का बदलतंय?

‘गुगल’ का बदलतंय?

गुगलच्या सर्च इंजिनच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटिलिजन्सने दिलेल्या उत्तराचा समावेश केला जाणार आहे. ‘जनरेटिव्ह एआय’मध्ये सुरू असलेल्या उलथापालथीत गुगल देखील भरडला जात आहे. गुगलच्या जेमिनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर येणारी एआय सामग्री ही इंटरनेटवर मिळणा-या माहितीचे सारांश रूप असेल आणि ते स्रोतच्या लिंकसह समोर येईल.गुगलमध्ये होणारा बदल हा काळानुसार होत आहे. ‘परप्लेक्सिलिटी’ सारख्या एआयची शक्ती असलेल्या सर्च इंजिनमुळे गुगलवर दबाव वाढत आहे. चॅटजीपीटीची मालकी असलेली कंपनी ओपन एआय देखील स्वत:चा एआय सर्च टुल तयार करत आहे. एवढेच नाही तर एआय चॅटच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सर्चिंग केले जात आहे. यासाठी गुगलची आवश्यकता युजरला भासत नाही.

गुगलच्या सर्च इंजिनच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटिलिजन्सने दिलेल्या उत्तराचा समावेश केला जाणार आहे. ‘जनरेटिव्ह एआय’मध्ये सुरू असलेल्या उलथापालथीत गुगल देखील भरडला जात आहे. कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, ‘मला घोषणा करताना आनंद होत आहे आणि आम्ही अमेरिकेत या आठवड्यात एक नवा अनुभव सांगण्यासाठी उत्सुक आहोत आणि तो म्हणजे ‘एआय ओवरव्हू’. हा आश्चर्यकारक बदलाचा अनुभव दुस-या देशातील नागरिक लवकरच घेऊ शकतील. एरवी गुगलच्या सर्चचे निष्कर्ष हे सामान्यपणे लिंक स्वरूपात येतात, मात्र त्याअगोदर एआय पुढचे पाऊल टाकत त्याचे संक्षिप्त सार समोर येईल. गुगलच्या जेमिनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर येणारी एआय सामग्री ही इंटरनेटवर मिळणा-या माहितीचे सारांश रूप असेल आणि ते स्रोतच्या लिंकसह समोर येईल. गुगलच्या सर्च टीमचे प्रमुख लिज रीड म्हणाले, आपल्या डोक्यात जे काही असेल आणि आपण जे काही करू इच्छितात, त्याची विचारणा करू शकतात. मग योजना असो किंवा योजना असो. यासाठी गुगल मेहनत करेल.

बदलाचे कारण
गुगलमध्ये होणारा बदल हा काळानुसार होत आहे. ‘परप्लेक्सिलिटी’ सारख्या एआयची शक्ती असलेल्या सर्च इंजिनमुळे गुगलवर दबाव वाढत आहे. चॅटजीपीटीची मालकी असलेली कंपनी ओपन एआय देखील स्वत:चा एआय सर्च टुल तयार करत आहे. एवढेच नाही तर एआय चॅटच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सर्चिंग केले जात आहे. यासाठी गुगलची आवश्यकता युजरला भासत नाही. या पर्यायाने उमटणा-या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. कारण या सर्चचे निकाल पारंपरिक रूपातील उत्तर नसतात. अर्थात कंटेट तयार करणारे आणि किरकोळ प्रकाशक या बदलावरून थोडे गोंधळात पडले आहेत.

या नवीन फीचरमुळे नागरिक आता लिंकवर क्लिक करून संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती गोळा करणार नाहीत. रिसर्च फर्म गार्टनर यांच्या अंदाजानुसार, एआय बॉटच्या वापरामुळे २०२६ पर्यंत सर्च इंजिनच्या माध्यमातून संकेतस्थळावर येणा-या युजरची संख्या ही २५ टक्क्यांनी कमी होऊ शकते. चॅटजीपीटीच्या स्टाईलमध्ये ‘एआय’चा वापर हा गुगलच्या व्यवसायावर काय परिणाम करेल? या प्रश्नावर गुगलचे सर्च प्रमुख रीड यांनी बचावात्मक भूमिका घेतली. ते म्हणाले. एआय ओवरव्यूच्या मदतीने युजर सर्च इंजिनचा वापर अधिक करत आहेत आणि ते त्याच्या परिणामाने समाधानी आहेत. कंपनीच्या मते, जनरेटिव्ह एआय टूल ग्राहकांचे जीवन सुस करत आहे. आता ते एआय ओवरव्यूच्या मदतीने रविवारीही सुरू राहणा-या योगा स्टुडिओचा शोध घेतील किंवा एखादा आवडीचा खाद्यपदार्थ. परिणामी गुगल लवकरच व्हीडीओ आधारित कंटेट सर्चसाठी ‘एआय’ चा वापर कसा करता येईल याची चाचणी देखील करेल.

गुगलचा नवा प्रोजेक्ट
गुगल आता ‘एक्स्ट्रा’ या नव्या प्रोजेक्टची देखील झलक सादर करत आहे. या प्रोजेक्टमध्ये डिजिटल असिस्टंट विकसित केले जात आहे आणि ते लहान-मोठे काम करण्यास सक्षम असतील. गुगलच्या ‘डिपमाईंड’चे प्रमुख डेमिस हसाबिस म्हणतात, आम्ही दीर्घकाळापासून दैनंदिन जीवनात मदत करणा-या व्यापक स्वरूपातील एआय एजंटची निर्मिती करू इच्छित आहोत. आम्ही असे एक भविष्य घडवत आहोत की तेथे कुशल सहायक असेल मग तो मोबाईल फोन असो किंवा नव्या रूपातील असणारा चष्मा. एआय एजंटचा प्रयोग हा गुगलच्या काही प्रॉडक्टवर होईल. जसे जेमेनी अ‍ॅप आणि वर्षाच्या शेवटी असिस्टंटवर. एआय जगात गुगलचा ‘ओपन एआय’शी जोरात सामना होत आहे. ‘ओपन एआय’ने या आठवड्यात एआय सर्चचे नवीन व्हर्जन जीपीटी-४ लाँच केले. हे नवीन व्हर्जन आवाज, चाचणी आणि फोटोच्या माध्यमातून कमांड देईल. जेनरेटिव्ह एआय तंत्रज्ञान हे जगातील नवीन रणभूमी आहे. तेथे अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत. आयफोनवर चॅटजीपीटीच्या तंत्राचा वापर होत असताना दुसरीकडे ओपन एआय आणि अ‍ॅपल यांच्यात होत असलेल्या कराराच्या बातम्या देखील या स्पर्धेची एक झलक आहे.

मायक्रोसॉफ्टचा नवा एआय पर्सनल संगणक
दिग्गज अमेरिक टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एआय फीचर्सयुक्त पर्सनल कॉम्प्युटर न्यू जनरेशन आणले. वॉशिंग्टनमध्ये आपल्या रेडमंड कॅम्पसमध्ये मायक्रोसॉफ्टचे चीफ एक्झिक्युटिव्ह सत्या नाडेला यांनी कोपायलट प्लस पर्सनल कॉम्युटर्स लाँच केले. कोपायलट प्लस कॉम्युटर्स हे आर्टिर्फिशियल इंटिलिजन्सयुक्त आहे. सध्या संगणकात एआयचा वापर करण्यासाठी क्लाऊड बेस्ड एआय प्लॅटफॉर्मपर्यंत जावे लागते. मायक्रोसॉफ्टच्या मते, कोपायलट प्लस क्लाऊड डेटा सिस्टिमशिवाय एआयशी संबंधित असणारे टास्क पूर्ण करेल.
को-पायलट काय करू शकतो?
यात रिकॉल नावाचे फीचर आहे. या माध्यमातून युजरना आपल्या संगणकावरचे टास्क अनेक महिन्यानंतरही ट्रेस करता येतील. सध्या कॉम्प्युटरवरची ब्राऊझिंग हिस्ट्री ही रिसायकल बिन क्लीन केल्यानंतर सापडत नाही. मात्र को-पायलटच्या मदतीने कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट, वेबपेज किंवा फाईल पुन्हा घेता येऊ शकते. कोपायलट सादर करताना कंपनीने व्हॉईस असिस्टंट हा रिअल टाईम कोच होतो आणि माईनक्राफ्टसारखा व्हीडअीो गेम खेळण्यासाठी युजरची कशी मदत करतो, हे कंपनीने दाखविले. अशा साहाय्यकाचा वापर अभ्यास करणे आणि कॅलेंडरला अपडेट करण्यासाठी देखील केला जातो. मायक्रोसॉफ्टच्या मते, चॅटजीपीटीचे नवे व्हर्जन जीपीटी-४ देखील लवकरच कोपायलटचा हिस्सा असेल. को-पायलट प्लसयुक्त संगणकाची किंमत १ हजार डॉलरने सुरू होते. कंपनीच्या मते, त्याची विक्री जून महिन्यात सुरू होईल. पर्सनल कॉम्प्युटर तयार करणारे बा निर्माते जसे एसर, आसुस्टेक कंपन्याही त्याची विक्री करू शकतील.

बाजारात कोणाचा दबदबा?
मायक्रोसॉफ्टचे कन्झ्युमर मार्केटिंग हेड युसूफ मेहदी यांच्या मते, पुढील वर्षापर्यंत पाच कोटी एआय पीसींची विक्री होईल. ते म्हणतात, दीर्घकाळानंतर पर्सनल कॉम्प्युटरला प्रत्यक्षात अपडेट करण्याची संधी आता आली आहे. कॉम्प्युटरवर थेटपणे चालणारे एआय असिस्टन्स हा देखील मोठा बदल आहे, असे ते मानतात. कॉम्प्युटिंगशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही क्रांतिकारी मानली जाते. एका अंदाजानुसार, आगामी काळात हा बाजार अब्जावधी डॉलरचा राहू शकतो. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक टेक कंपन्या आणि स्टार्टअप या बाजारावर छाप पाडू शकतात. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट आणि अ‍ॅपल देखील या शर्यतीत आहे. पर्सनल कॉम्प्युटरमध्ये अजूनही खूप काम स्वत:ला करावे लागते. वास्तविक फोन एडिट करणे, एक्सल शिट मॅनेज करणे, प्रझेंटेशन तयार करणे आणि आकडेमोड करणे यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. एआय फीचर्सयुक्त संगणकाच्या माध्यमातून अनेक काम व्हॉईस कमांडच्या मदतीने केले जाते. या नव्या विश्वात कोणत्या कंपनीचे कोणते तंत्रज्ञान विश्वासार्ह आहे, यासाठी मोठी चढाओढ लागली आहे.

-महेश कोळी, संगणक अभियंता

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR