30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात?

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात?

अहमदाबादेत टेकऑफवेळी मोठी दुर्घटना

अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादेत एअर इंडियाचे विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. २४२ प्रवासी विमानात असल्याची माहिती असून एअर अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानामध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या अपघातामुळे मोठ्या हानीची शक्यता वर्तवली जात असून टेकऑफच्या १० मिनिटांनंतर हे विमान अहमदाबाद येथे कोसळले. हे प्रवासी विमान लंडनला जात होते. विमान लंडनला जात असताना टेकऑफवेळी हा विमान अपघात झाला.

ही घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं त्याच्या जवळच सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे यात जखमी झालेल्यांना आणि होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात आणलं जात आहे. मोठी जीवितहानी या विमान दुर्घटनेत झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR