अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादेत एअर इंडियाचे विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. २४२ प्रवासी विमानात असल्याची माहिती असून एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी याच विमानामध्ये असल्याचे बोर्डिंग पास मिळाले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे मोठ्या हानीची शक्यता वर्तवली जात असून टेक ऑफच्या १० मिनिटानंतर हे विमान अहमदाबाद येथे कोसळले. हे प्रवासी विमान लांडनला जात होते. विमान लांडनला जात असताना टेकऑफवेळी हा विमान अपघात झाला.
ही घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे. तातडीने बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं त्याच्या जवळच सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे यात जखमी झालेल्यांना आणि होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात आणलं जात आहे. मोठी जीवितहानी या विमान दुर्घटनेत झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.