31.2 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeक्रीडागुजरातसह पंजाब, आरसीबी प्लेऑफमध्ये

गुजरातसह पंजाब, आरसीबी प्लेऑफमध्ये

गुजरातचा शानदार विजय, दिल्लीला दे धक्का
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुजरात टायटन्सने आयपीएलच्या ६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर १० गडी राखून शानदार विजय मिळविला. दिल्लीने गुजरातला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान १९ षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. गुजरातने २०५ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. साईने शतकी खेळी केली तर शुबमनने नाबाद ९३ धावा केल्या. गुजरातने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली.

गुजरातच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये दाखल झाले.
शुबमन आणि साईने नाबाद द्विशतकी भागीदारीसह इतिहास घडवला. साई आणि शुबमन आयपीएल इतिहासात नाबाद सलामी द्विशतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली. या दोघांनी या भागीदारीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. साईने या खेळीत ६१ चेंडूत ४ षटकार आणि १२ चौकारांसह १०८ धावांची नाबाद खेळी केली तर शुबमनने ५३ बॉलमध्ये ७ सिक्स आणि ३ फोरसह नॉट आऊट ९३ धावा केल्या.

त्याआधी गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. दिल्लीसाठी केएल राहुलने नाबाद शतकी खेळी केली. त्याने ६५ बॉलमध्ये १४ फोर आणि ४ सिक्ससह नॉट आऊट ११२ रन्स केल्या. अभिषेक पोरेलने ३० रन्स केल्या. कर्णधार अक्षर पटेलने २५ धावांचे योगदान दिलं. तर ट्रिस्टन स्टब्सने २१ धावा केल्या.

गुजरातच्या विजयाने
दोन संघांचा फायदा
गुजरातच्या विजयामुळे इतर २ संघांचाही फायदा झाला. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघही प्लेऑफमध्ये पोहोचले. गुजरातचा हा नववा विजय ठरला. त्यामुळे गुजरात १८ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाले तर आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी १७-१७ गुण आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुस-या आणि पंजाब किंग्स तिस-या स्थानी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR