16.5 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रगुटखा विकणा-यांवर आता मोक्का

गुटखा विकणा-यांवर आता मोक्का

हार्म आणि हर्टनुसार कायद्यात बदल, झिरवळ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

दरम्यान, राज्यात गुटखा बंदी असतानाही पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सरकार आता गुटखा विक्री करणा-यांवर थेट मोक्काची कारवाई करणार आहे. गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणा-यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

त्यानुसार नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणणार आहे, कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचेही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

गुटखाबंदी कायदा
अधिक कठोर होणार
गुटखाबंदी कायदा कठोर करण्यासाठी व मकोका लावण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे निर्देश नरहरी झिरवाळ यांनी अधिका-यांना दिले. त्यामुळे आता राज्यातील अवैध गुटखा व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून गुटखा विक्रीवर निश्चित त्याचा परिणाम दिसून येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR