अहमदपूर : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेच्या बारा प्रभागातील २५ नगरसेवकांसाठी बुधवारी बुधवारी येथील उपविभागीय कार्यालयातील सभागृहात नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या उपस्थितीत शाळकरी मुलाच्या हाताने चिठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यावेळी अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले असून थोडी खुशी थोडा- गम अशी अवस्था पहायला मिळाली आहे. प्रभाग क्रमांक १) अ.-सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २) अ. अनुसूचित जाती महिला.ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ३) अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
३ ब.) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ५) अ. सर्वसाधारण महिला-५ ब). सर्वसाधारण., प्रभाग क्रमांक ६) अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. ६ ब.)-सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ७)अ. अनुसूचित जाती., ७ ब)- सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक -८)अ.- अनुसूचित जाती महिला. ८ ब.)-सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ९ )अ.-नागरिकांचा मागास प्रवर्ग ९ ब.) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक १० )अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग १० ब.) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ )-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग. ११ ब.) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक १२ )अ. अनुसूचित जाती. १२ ब.) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. १२ क.) सर्वसाधारण महिलेसाठी सुटला आहे.
अहमदपूर शहरात एकूण बारा प्रभाग आहेत. अकरा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यावयाचे असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये मात्र तीन नगरसेवकांना मतदारांनी निवडून द्यावयाचे आहे. शहरात सर्वसाधारण पुरुष आठ व महिला सहा असे एकूण १४ , याबरोबरच अनुसूचित जाती पुरुष दोन, महिला दोन एकूण ०४, आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष तीन, महिला चार एकूण ०७ असे एकूण २५ नगरसेवक शहरांमध्ये निवडून द्यावयाचे आहेत.नगरसेवक होण्यासाठी काही नवतरुण गेल्या पाच वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या प्रभागातील काही सामाजिक कार्य तर काही वैयक्तिक लोकांची कामे जोमाने करीत होते. खर्चही केला पण त्यांच्या प्रभागामध्ये मनासारखे आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी पहायला मिळाली.