34.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeपरभणीगुणवंत विद्यार्थी अनिकेत शिंदे, शितल आव्हाड, सविता जीवने यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थी अनिकेत शिंदे, शितल आव्हाड, सविता जीवने यांचा सत्कार

कौसडी : जि. प. प्रशाला कौसडी शाळेतील इयत्ता नववी प्रवेश पात्र जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत अनिकेत बालासाहेब शिंदे याची निवड झाल्याबद्दल त्याचा आई-वडिलांसह शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शितल रखमाजी आव्हाड (९५.६०) व सविता मनोहर जीवने (९५.४०) टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीची भारतीय टपाल खात्यामध्ये डाकसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापिका सुनिता गांजरे, शिक्षिका सुरेखा खरटमोल, मीरा कुंभारे, वंदना रेवतकर, सपना वैद्य, शिक्षक गजानन पांचाळ, मनोज भालेराव, गणेश काळे, अभिजित मोरे, ज्ञानेश्वर बर्वे, दशरथ भिसे, कुंडलिक राठोड, सारिका कदम, हजरा शेख व उषा शेळके मावशी या सर्वांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सारिका ज्ञानेश्वर जीवने यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेशराव बारवकर, उपाध्यक्ष अकबर बेग, सदस्य सुनिल कसाबकर, महेश गिरगावकर, अनिता खैरे, प्रयाग हराळे, सारिका जीवने, ज्ञानेश्वर जीवने, खालेख पठाण, माधवराव खरात उपस्थित होते. सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR