जालना : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देत परभणीत वक्तव्ये केली होती. आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी जरांगे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता जरांगे-पाटील यांच्यावर परळी, अंबाजोगाई येथे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यावरून जरांगे-पाटील भडकल्याचे पाहायला मिळत आहेत.
संतोष देशमुख हे गावाचे प्रमुख आणि सरकारमधील एक घटक होते. संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अरेरावी करण्यात येते. त्याबद्दल बोलायचे नाही का? मग आम्ही कोणता जातीयवाद केला दाखवा बरं? असा संतप्त सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.