31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeसोलापूरगूढ आवाजाने सांगोला हादरले

गूढ आवाजाने सांगोला हादरले

सोलापूर : प्रतिनिधी
सांगोला शहर आणि तालुका बुधवारी (९ एप्रिल)दुपारी ३.५३ मिनिटांनी प्रचंड गूढ आवाजाने पुन्हा हादरला. या आवाजामुळे घरे हादरली, घरावरील पत्रे, खिडक्या, तावदाने थरथरली. सांगोल्यात गुरुवार ३ एप्रिलला सकाळी ११.२२ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे काही क्षणांसाठी सौम्य धक्केही जाणवले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी प्रचंड गूढ आवाजाने सांगोला हादरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुष्काळी सांगोला तालुका हा अवर्षण प्रक्षेत्रात येत असून पर्जन्यमान कमी राहते. मागील ४-५ वर्षांपासून सांगोला शहर, तालुक्यात अधूनमधून प्रचंड गूढ आवाज येत आहेत. अनेकांनी हा आवाज फायटर विमानाचा आहे तर भूगर्भात लावारस तयार झाल्यामुळे त्याचा उद्रेक होऊन असे गूढ आवाज होतात असे वेगवेगळे तर्क लावले आहेत. परंतु आतापर्यंत प्रशासनाला नेमका कुठून आणि कशाचा प्रचंड गूढ आवाज होतोय याचा शोध घेता आला नाही.

३१ मार्च रोजी एकामागून एक असे सलग २ वेळा प्रचंड गूढ आवाज आल्यामुळे सांगोला शहर व तालुका हादरला होता. त्यानंतर गुरुवारी ३ एप्रिलला सकाळी ११.२२ मिनिटांनी सांगोल्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला तर बुधवारी ९ एप्रिलला परत प्रचंड गूढ आवाज झाला आहे त्यामुळे नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR