27.5 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeमहाराष्ट्रगृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल लंपास

गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल लंपास

योगेश कदमांची केज पोलिस ठाण्यात तक्रार

बीड : प्रतिनिधी
राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर येत आहे. योगेश कदम हे काल बीडच्या दौ-यावर होते. मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क माध्यमांच्या कॅमे-यासमोर गहाळ झाला आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बीडमध्ये गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल गहाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

योगेश कदम हे काल बीड दौ-यावर आले होते. या दौ-यादरम्यान त्यांचा मोबाईल गायब झाला. शुक्रवारी योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे होते. यावेळी योगेश कदम यांचा मोबाईल अचानक गायब झाला. योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.

केज पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार
योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

योगेश कदमांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर आता राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नाही. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्याची माहिती योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR