32.6 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeमहाराष्ट्रगोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणीचा मृतदेह

गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणीचा मृतदेह

मोखाडा (पालघर) : नाशिक-मोखाडा-जव्हार मार्गावर असलेल्या वाघ नदीत आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. गोणीमध्ये बांधून फेकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून सदर तरुणीची हत्या करून नदीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक-मोखाडा-जव्हार या मार्गावरील घाटकरपाडा येथील वाघ नदीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा मृतदेह हा एका सुतळी गोणीत भरून वाघ नदीच्या पुलावरून खाली फेकून दिला आहे. परिसरातील नागरिकांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.

सदर तरुणीला गळफास देऊन तिची हत्या करून या ठिकाणी फेकण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे असून अंगावर पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगिंग्ज असून याबाबत मोखाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोल व कर्मचारी तपास करत आहेत. अद्याप तरुणीची ओळख पटली नसून या मृतदेहाची प्रथामिक तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR