23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeलातूरगोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १२.५० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री योगेश कदम, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना उपस्थित राहणार  आहेत.  या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR