लातूर : प्रतिनिधी
लातूर विभागीय कनिष्ठ ऍथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये गोल्डक्र्रेस्ट हाय, लातूर शाळेच्या आयान दोंतुलवार या विद्यार्थ्याने चमकदार कामगिरी करत शाळेचा आणि संस्थेचा गौरव वाढवला आहे. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत आयान दोंतुलवार याने १०० मीटर आणि २०० मीटर धावस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. या उत्कृष्ट यशामुळे आयान दोंतुलवार याची राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, विश्वस्त सौ. अदिती अमित देशमुख शाळेच्या प्राचार्या सौ. उषाकिरण सूद, क्रीडा मार्गदर्शक शुभम गोडगे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी आयानचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

