लातूर : प्रतिनिधी
गोव्याची राज्य निर्मित दारु परमिट रूममधून विक्री करणे हे औसा तालुक्यातील हिप्परगा व आशिव येथील परमिट रूम मालकांना चांगलेच महागात पडले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या दोन्ही परमिटरुम कायमस्वरुपी रद्दकेले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ नोव्हंबर २०२५ रोजी मे. हॉटेल आरुष एफएल-३ अनुज्ञप्ती क्र. ७३३, हिप्परगा, ता. औसा, जि. लातूर येथे गोवा राज्य निर्मित मद्य विक्री तसेच कोरडा दिवस असतांना मद्यविक्री केले बाबत आणि दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मे. हॉटेल स्वप्नस्पर्श एफएल-३ अनुज्ञपती क्र. ६७१, आशिव, ता. औसा, जि. लातूर येथील गोवा राज्य निर्मित मद्य विक्रीच्या गुप्त माहितीनुसार मद्यविक्री होत असल्याचे निदिर्शनास आल्यामुळे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, निलंगा यांनी दोन परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर कडक कारवाई करुन अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी, लातूर यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केले असता जिल्हाधिकारी, लातूर यांच्या सदर गंभीर विसंगतीविरोधात दिलेल्या आदेशान्वये सदर दोन्ही अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्य करण्यात आल्या आहेत.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, केशव राऊत, उपअधीक्षक एम. जी. मुपडे, निलंगा निरीक्षक आर. व्ही. कडवे, दुय्यम निरीक्षक एस. डी. घुले, एस. पी. काळे, डी. डी. साळवी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश गुणाले, जवान प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, समाधान गिरी, गिता शेन्नेवाड यांनी सहभाग नोंदविला.

